क्राइम
रात्री घरफोडी आणि दिवसा मोबाईल चोरी…..!
जळगाव (जा) दि.१२ ( नागेश भटकर) शहरातल्या मध्यभागी असलेल्या रामदेव नगरात 6 ऑगस्ट रोजी एकाच रात्री 3 घर फोडया झाल्याची घटना घडली.मात्र चोरीचा माल परत भेटत नाही म्हणून काही नागरिक तक्रार करायला पुढे येत नाहीत.
रामदेव नगरातील माजी प्राचार्य राजकुमार किसनलाल फाफट हे काही कामानिमित्त आपल्या मुलांकडे 31 सप्टेंबर रोजी पुण्याला गेले होते. 6 ऑगस्ट रोजी ते घरी परतले तेव्हा त्यांना दिसले की घराच्या मुख्याद्वाराचा कुलूप तुटलेला आहे. त्यांनी घरात प्रवेश केला आणि पाहणी केली असता घरातल्या अलमारीतील सामान अस्ताव्यस्त होते. आणि त्याच्यातून एक मोठी सोन्याची पोत 30 ग्राम व कानातले सोन्याचे 5 रिंग टॉप 9 ग्राम, सोन्याची डायमंड रिंग, 3 ग्राम आणि 10 हजार नगदी असे एक 166000, रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार फाफट यांनी जळगाव पोलीस ठाण्यात दिली.
एवढेच नव्हे तर दिनांक 2 ऑगस्टला आदिवासी आश्रम शाळा जवळून एका मुलीच्या हातातून मोबाईल दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली तेही जळगाव पोलीस स्टेशनच्या किमान 50 मीटर अंतरावर ही घटना घडली.तसेच 6 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनच्या आवाराच्या जवळ एका शिक्षकाच्या हातातून मोबाईल हिसकून दोन अज्ञात चोरटे नेत असताना त्या शिक्षकांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना धक्का दिला ते खाली पडले आणि त्यांचा मोबाईल वाचला.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना शहरांमध्ये पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.वाढत्या घटनांमुळे शहरासह तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे.