15 ऑगस्ट रोजी सहय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत माहिती मिळल्या नुसार धारुर येथील रंगार गल्ली येथे जयराज तिवारी यांचे घराजवळच्या पत्राच्या शेडमध्ये जयराज मोहनप्रसाद तिवारी व त्यांच्या सहका-यांनी स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या गोवा गुटका व इतर माल चोरटी विक्री करण्यासाठी त्याचा साठा करून विक्री करत आहे.त्यानुसार सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्यावरून त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी दोन पंचांना सोबत घेऊन धारूर येथील रंगार गल्ली येथे मंगळवारी (दि.15) रात्री साडेसात वाजता जाऊन छापा मारला असता या ठिकाणाहून दोन इसम पोलिसांना पाहून पळून गेले व एक इसम आकाश किशोरप्रसाद तिवारी हा त्या जागेवर मिळून आला. त्यास पळून गेलेल्यांची नावे विचारले असता जयराज मोहनप्रसाद तिवारी व ज्ञानोबा श्रीराम साक्रोडकर असे सांगितले. त्यांच्या ताब्यातील पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता शेडमध्ये गोवा गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखू, बाबा, रत्ना, असा एकूण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा माल् मिळून आला. सदरचा माल कोठून व कोणाकडून आणला असे विचारले असता त्यांनी सांगितले की जयराज तिवारी व ज्ञानोबा साक्रोडकर यांनी बीड येथील व्यापारी महारुद्र उर्फ आबा मुळे यांच्याकडून आणल्याचे सांगितले. सदरचा माल जागीच जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला. या प्रकरणी चारही आरोपी विरुद्ध जमादार राजू रूपचंद वंजारे यांचे फिर्याद वरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरील कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार बालाजी दराडे, राजू वंजारे, विकास चोपणे, अनिल मंदे यांनी केली.