#Accident
मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक…..!
केज दि.१६ – शहरातून जाणाऱ्या केज कळंब रोडवर मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या एकाला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने सदरली इसम गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर लातूर येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
केज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील खुरेशी मोहल्ला येथील शहाबाज खदीर मिया कुरेशी वय वर्षे 31 व त्यांची पत्नी हे मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉक साठी केज कळंब रोडवर गेले होते. दरम्यान ते घराकडे परत येत असताना पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये शहबाज खुरेशी यांना जबरदस्त मार लागला असून त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच छातीलाही मार लागल्याने बरगड्या तुटल्या असून उजवा हाती निकामी झाला आहे. तर सदरील अपघातामध्ये त्यांच्या डोक्याच्या पाठीमागील भागालाही गंभीर मार लागला असून अपघात ठिकाणीच त्यांच्या नाका तोंडातून ही रक्त आल्याची सांगितले जाते.
सदरील अपघात झाल्यानंतर त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र इजा गंभीर असल्याने त्यांना आंबेजोगाईला पाठवण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार झाला आणि त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील एका खाजगी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे.
दरम्यान केज कळंब आणि केज बीड रोडवर मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर मागच्या काही वर्षापासून कित्येक अपघात झालेले आहेत. आणि यामध्ये अनेकांना आपला जीवही गमावा लागलेला आहे. सकाळी लोक फिरायला जातात मात्र सुसाट वेगाने वाहने घेऊन जाणारे लोक अशा प्रकारे अपघात करतात. सदरील गाडी कोणाची आहे याचा शोध पोलीस घेतीलच परंतु या अपघातामध्ये शहबाज खुरेशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नीला सुदैवाने इजा झालेली नाही.