#Accident
बेडरूममध्ये झालेल्या स्फोटात 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…..!

बीड दि.२० – भीषण स्फोटमध्ये १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना बीड शहरातील सर्कस ग्राउंड भागत दि.२० रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली.स्फोट नेमका कशाचा आणि कशामुळे झाला याचे कारण अद्यापर्यंत समजू शकले नाही.
बीड शहरातील नगर रोड भागात गौरी कलर या नावाने दुकान असणारे विकास डावकर यांच्या प्रसाद हा 18 वर्षीय शिक्षण घेणारा मुलगा बेडरूममध्ये असताना रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्तिशाली होता की त्यामध्ये बेडरूम पूर्णपणे जळून खाक झाली.या ठिकाणी असलेला प्रसाद हा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला. घराला तडे देखील गेले आहेत.
दरम्यान, सदरील स्फोट नेमका कशाचा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून 18 वर्षीय तरुणाला मात्र जीव गमवावा लागला आहे.