#Judgement
ना.धनंजय मुंडे यांची निर्दोष मुक्तता….!
केज दि.२८ – धारूर पंचायत समितीच्या सभापती निवडी वरून तेलगाव येथे दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणी सरकार पक्षातर्फे पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात ना धनंजय मुंडे यांच्या सह इतरांची केज येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्या आधारे निर्दोष मुक्तता केली आहे
दि. १२ मार्च २००८ रोजी धारूर पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून तेलगाव येथे दोन गटात हाणामारी झाली होती त्या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकां विरोधात फिर्याद दिली नव्हती परंतु सरकार पक्षातर्फे दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनी फिर्यादी होऊन राजाभाऊ मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह २२ जणांच्या विरुद्ध गु. र. नं. २९/२०२३ भा. दं. वि. १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ३३६, ३३७ नुसार राजाभाऊ मुंडे, सतीश बबन बड़े, धनंजय मुंडे, वाल्मिकी कराड, विजय लगड, दामोदर धुमाळ, गणपत धुमाळ, महादेव गोरे, विठ्ठल गोरे, सूर्यकांत उर्फ सूर्यभान मुंडे, चंद्रकांत हरिकिशन लगड, बंडू शेतिबा जाधव, बालासाहेब धर्मजी लगड, गणेश बंडू लगड, भुजंग जाधव, चिंतामण लगड, युवराज लगड, अशोक जाधव, भास्कर उत्तम जाधव, उद्धव जाधव, संतोष लगड, लखन जाधव, अनंत पवार आणि लहू जाधव या चोवीस जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यातील गणपत धुमाळ आणि उद्धव जाधव हे मयत झाले आहेत. त्या नंतर जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव येथे त्यांच्यावर दोषारोप दाखल करण्यात आले होते.
दरम्यान धारुर आणि केज तालुक्यातील सर्व प्रकरणे केज येथे नव्याने सुरू झालेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद व पुरावे याचे अवलोकन करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कुणाल जाधव यांनी सर्वांची सबळ पुराव्या आधारे निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ऍड. कवडे, मुंडे आणि डक यांनी काम पाहिले.