ब्रेकिंग
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्य नागरिकांना होणार फायदा…..!

देशात प्रचंड महागाई वाढली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तर अतिशय जास्त वाढ झालीय. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक सातत्याने याबाबत तक्रार करताना दिसतात. देशातील घराघरातील महिला या गॅस सिलेंडरच्या दराबाबत तक्रार करताना दिसतात. गेल्या काही वर्षांपासून गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकदा मोदी सरकारवर अनेकांनी टीका केली आहे. अखेर सर्वसामान्यांची महागाईच्या तक्रारीची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने सर्वसामान्यांसाठी आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे आता देशभरात गॅस सिलेंडरचे दर हे 200 रुपयांपर्यत कमी होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता देशभरात त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. तसेच आगामी काळात राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्याआधी मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना होईल, अशीदेखील माहिती जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या निर्णयाचा फायदा सरसकट सर्वांना होणार नाही तर फक्त उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना मिळणार आहे.