केज दि.१३ – तालुक्यातील लाखा गावात एक अघोरी प्रकार समोर आला असून गावातील कांही मोक्याच्या ठिकाणी तसेच घरासमोर हळदी कुंकू आणि लिंबू टाकल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाखा गावातील लोक बुधवारी जागे झाल्यानंतर एक वेगळाच अनुभव आला.गावातील अनेक ठिकाणी पूजा केल्या प्रमाणे चौकोन काढून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल सुदृश्य दिसून आल्याने खळबळ निर्माण झाली.सदरील प्रकार नेमका काय आहे? रात्रीतूनच हा प्रकार कुणी केला ? हे न समजल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.