आपला जिल्हा
केज आयएमए च्या अध्यक्षपदी डॉ. दिनकर राऊत तर सचिव पदी डॉ. भाऊसाहेब चाळक यांची वर्णी…..!
केज दि.२० – गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर केज (जि. बीड) येथील इंडियन मेडिकल असोसिएशन च्या नवीन पदाधिका-यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यामध्ये नुतन अध्यक्ष म्हणून केज शहरातील योगिता नर्सिंग होमचे बालरोगतज्ज्ञ डॉ.दिनकर राऊत, सचिव पदी डॉ. भाऊसाहेब चाळक, डॉ. बाळासाहेब सावंत यांची कोषाध्यक्ष तर डॉ. शशिकांत केंद्रे यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली.
महाराष्ट्र राज्य आय एम ए चे अध्यक्ष डॉ. रविंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, कळंब आय एम ए शाखेचे सचिव डॉ. सत्यप्रेम वारे यांच्या उपस्थितीत सदरील पदाधिकारी मंडळ निवड सर्वानुमते करण्यात आली. या कार्यकारी मंडळाचा कालावधी २०२३-२०२५ साठीचा आहे. लवकरच नवीन कार्यकारी मंडळाचा पदग्रहण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.