#Social
केज येथे दोनशे विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वितरण…..!
केज दि.३० – शहरातील मुक्ताई मंगल कार्यालयात शनिवार रोजी गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले.सेन्टर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया आणि अटलास कॉपको इंडिया प्रा. ली या कंपनीच्या सहयोगाने व क्रांतिसिंह नाना पाटील शेतकरी विकास प्रतिष्ठाण केज यांच्या सहकार्याने केज तालुक्यातील गरीब गरजू मुली ज्या रोज शाळेत ३ ते ४ किलोमीटर पायी चालत जातात त्यांना २०० सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी दादासाहेब शेळके पाटील (सीनियर सोर्सिंग इंजिनियर ॲटलास कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड), सी एफ टी आय या संस्थेचे विश्वस्त सिद्धेश बागवे, आंबेजोगाई येथील अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, मोहन गुंड, प्रा. कापसे, अशोक रोडे, डॉ. हनुमंत सौदागर, शिशिकांत इंगळे, शत्रुघ्न तपसे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीत देशपांडे, अमोल शिनगारे यांनी केले.
यावेळी बोलताना श्री.शेळके म्हणाले की, यापुढेही महाराष्ट्रात गरजूवंत अनेक विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या स्वरूपात मदत करत राहू.