
केज दि.३ – तालुक्यातील एका गावात नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून त्यात ती गरोदर असल्याची माहिती उघड झाली आहे.
तालुक्यातील एका गावात नववीच्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर गावातील एका २५ वर्षाच्या व्यक्तीने सहा महिन्या पूर्वी वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली असून तिच्या पालकांच्या निदर्शनास ही बाब आल्या नंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गु. र. नं. ५९७/२०२३ भा. दं. वि. ३५४ (ड), ३५४, ४५२, ३७६ (२) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ (२), ६, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीला पोलिसांनी न्यायालया समोर हजर केल्या नंतर न्यायालयाने आरोपीला ६ ऑक्टोबर पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.