सक्रीय क्षयरोग शोध मोहीम सुरू…..!
केज दि.४ – केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत “सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीम” राबविण्याच्या निर्णय राज्य स्तरावर घेण्यात आला आहे. या मोहिमेत प्राथमिक अवस्थेतील क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे हे प्रमुख उद्दिष्ट असून सदरील मोहिमेला सुरुवात झाली आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व अद्याप निदान न झालेल्या संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुने व क्ष-किरण तपासणी करुन निदान निश्चितीनंतर त्यांचेवर तात्काळ औषधोपचार सूरू करणे हे उद्दिष्ट नजरेसमोर संशयित क्षयरुग्णांची निदान निश्चिती करणे हा या कार्यक्रमाचा भाग आहे.आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत सर्व तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी, कारागृहातील कैदी, दगड फोडणारे कामगार, वृध्दाश्रम, रात्रीची आश्रमशाळा, लोकसमुदयातीलच, अतिकुपोशित, HIV बाधित व्यक्ती, आदिवासी भागातील कमी हवेशीर असलेल्या आदिवासी झोपड्या, ज्या गावात रुग्ण जास्त असू शकतात असे गावे, आदिवासी शाळा व वस्तीगृह, मागील दोन वर्षापर्यंत टीव्ही रुग्णांचे कॉन्टॅक्ट, कापड गिरणीतील कामगार, चहा मळ्यातील कामगार, पोचण्यासाठी अवघड गावे व वस्त्या, निराधार असलेली घरे, रस्त्यावरची मुले व बेघर व्यक्ती, निर्वासितांचे छावणी, विणकाम व काचा औद्योगिक कामगार, कापड गिरणीतील कामगार, पारंपारिक पद्धतीने उपचार घेत असलेली गावे संशयित pediatric टीबी रुग्णांचे कॉन्टॅक्ट बांधकाम साईट्स, दगडखाणी इ. अतिजोखमीच्या भागात दिनांक ०३ ऑक्टोंबर ते १३ ऑक्टोंबर २०२३ या कालावधीत सर्वेक्षणाची फेरी आयोजित करण्यात येणार आहे.
सदर मोहिमेंतर्गत १४० पथकांच्या माध्यमातून २,८६,००० लोकसंख्येला भेटी देऊन नागरिकांची तपासणी करून जनजागृती करण्यात येणार आहे. क्षयरोगासाठी दोन आठवडयांपेक्षा जास्त खोकला, दोन आठवडयांपेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे, मानेवरील गाठ अशा लक्षणांबाबत विचारणा करण्यात येणार आहे. यामध्ये क्षयरोगाची लक्षणे आढऴल्यास 1 तासाच्या अंतराने दोन थुंकी नमुने घेऊन आणि एक्स रे करीता संदर्भित करुन तपासणी अंती निदान निश्चित करण्यात येणार आहे. सदर मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास थुंकी नमुने देऊन सहकार्य करावे असे अहवान माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेश माने सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास आठवले यांनी केले आहे.