#Crime
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाची मोठी कारवाई….!
बीड दि.१२ – सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभाग केज यांनी पोलीस स्टेशन नेकनुर हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची चोरटी वाहतुक करणारे पिकअप ताब्यात घेवुन एकुण 25,82,020/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन एकुण चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 11/10/2023 रोजी मा. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत , उपविभाग केज यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून बातमी तुळजापुर कडुन बीड कडे पिकअप क्रमांक MH 23 AU 4875 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले गुटख्याची चोरटी वाहतु करीत असले बाबत खत्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. कुमावत यांनी उपविपोअ कार्यालयातील बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, भरत शेळके, पोस्टे केज येथिल महादेव शमीम पाशा, महादेव बहिरवाळ यांना सदर गुटख्याची वाहतुक करणारे पिकअप ताब्यात घेणेसाठी पोस्टे नेकनुर येथिल पोउपनि रोकडे यांना सोबत घेवुन गुटख्याचे पिकअप ताब्यात घेण्याबाबत तोंडी आदेश दिले.त्यावरून पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी धुळे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग वरील मौजे वानगाव फाट्याजवळ संत तुकाराम महाराज मंदीरासमोर पिकअप सापळा लावुन पकडुन पिकअप मध्ये असलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला व सुगंधित तंबाखुचा माल असा एकुण 25,82,020/- (पंचविस लाख बेएंशी हजार वीस रुपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तर पोलीस नाईक दिलीप गित्ते यांचे फिर्यादीवरुन नमुद चार आरोपींविरुध्द पोलीस स्टेशन नेकणुर येथे गुरनं 317/2023 कलम 328, 272, 273, 34 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभाग केज यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, बालासाहेब डापकर, दिलीप गित्ते, अनिल मंदे, शमीम पाशा, महादेव बहिरवाळ, भरत शेळके यांनी केली.