क्रीडा व मनोरंजन
दयानंद माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड….!
बीड दि.१२ – वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथील दयानंद माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिनांक 10 व 11 तारखेला महाराष्ट राज्य क्रीडा व युवक सेवा संचालय व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेत दयानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवळा या शाळेच्या कु.जोगदंड शिवानी स्वामी(14 वर्ष वयोगट 400 मिटर धावणे स्पर्धेत प्रथम व कु.पवार पल्लवी नामदेव 17 वर्ष 3000 मिटर चालणे मध्ये प्रथम येऊन विभागीय स्पर्धा परभणी साठी पात्र झाल्या आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव रमेश आडसकर, अर्चना आडसकर, मु.अ. भागवत शिंदे, क्रीडा मार्गदर्शक संजय इंगळे, शेंडगे, दंदे इत्यादी कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.