#Resarvation
भालगाव येथील ग्रामस्थांचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार…..!
केज दि.१८ – तालुक्यातील भालगाव येथे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नाही, अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे जाहीर केले. निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल करणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे.
भालगाव येथील ग्रामसस्थांनी बुधवार (दि.१८) सकाळी ११ वाजता ग्रामस्थ, पॅनल प्रमुख व सरपंच पदाचे उमेदवार यांची एकत्रित बैठक झाली. यात सर्वांच्या वतीने ठराव घेतला की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार असेल. गावातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल करायचा नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित करा. जर निवडणुका घेतल्या तर भालगाव येथील एकही उमेदवार निवडणूकीत उमेदवारी दाखल करणार नसल्याचा निर्धार भालगाव ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी माजी सरपंच युवराज ढोबळे, अंकुश मोरे, मयूर सुरवसे बाळासाहेब मोरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.