ब्रेकिंग
वर्ल्डकप दरम्यान क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा…..!
नवीदिल्ली दि.२३ – क्रिकेट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज क्रिकेटरचं निधन झालं आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. टीम इंडियाला वर्ल्ड कप दरम्यान मोठा झटका लागला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. बिशन सिंह बेदी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
बिशन सिंह बेदी हे त्यांच्या काळातले दिग्गज स्पिनरपैकी एक होते. बिशन सिंह बेदी यांनी टीम इंडियाचं नेतृत्वही केलं होतं. बिशन सिंह बेदी यांनी 1967-1979 दरम्यान टीम इंडियाचं 67 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स घेतल्या. तसेच बिशन सिंह बेदी यांनी 10 वनडे मॅचमध्ये 7 बळी घेतले. तसेच बेदी यांनी 14 वेळा 5 विकेट्स घेतल्या तर एकदा 10 विकेट्स घेण्याचा कारनामा केलाय. बेदी हे स्पिनरच्या चौकडीपैकी एक होते.
भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केलेल्या बेदी यांनी निवृत्तीनंतर मेंटॉर आणि समालोचक म्हणूनही काम केले होते.