ब्रेकिंग
केज तालुक्यातील ”या” गावानेही घेतला मोठा निर्णय…..!
केज दि.२५ – मागच्या दीड महिन्यापूर्वी सुरु झालेल्या मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना सरकारने 40 दिवसाचा अवधी मागितला होता.मात्र तो संपूनही आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील कित्येक गावांमध्ये निवडणुकांवर बहिष्कार घालत नेते व कार्यकर्ते यांना गाव बंदी करण्यात येत आसल्याचे ठराव घेण्यात आलेले असून तालुक्यातील जाधव जवळा या गावाने ही सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालत नेते व कार्यकर्ते यांना गाव बंदी करण्यात येत असल्याचा ठराव ग्रामपंचायतच्या वतीने घेण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाचा दिलेला अवधी संपला असून पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा निर्धार केलेला आहे. आणि मागच्या दीड महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाहीत असा निर्धार केला असल्याने पक्षीय राजकारणालाही तिलांजली देण्याच्या मानसिकतेत गावकरी आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी केज तालुक्यातील भालगाव या गावाने ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार घालत गावातून एकही अर्ज निवडणुकीसाठी भरलेला नाही. संपूर्ण गावाने एक मुखाने मराठा आरक्षणाला मोठ्या प्रमाणावर पाठबळ दिले.
दरम्यान तालुक्यातील जाधव जवळा या गावानेही येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्यात येत असून सर्वच पक्षाच्या नेत्यांना व कार्यकर्त्याना गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आल्याचा ठराव ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आला आहे.तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दि.26 पासून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे ठरावात म्हटले आहे. तर तालुक्यातील सोने सांगवी गावच्या सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत असल्याचे एका निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.