ब्रेकिंग
बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू….!

बीड दि.30 – जिल्ह्यात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभुमिवर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी सोमवारी रात्री उशिरा बीड जिल्हा मुख्यालय आणि सर्व तालुका मुख्यालयाच्या 5 कि.मी. परिसरात तसेच राष्ट्रीय महामार्गावर पुढील आदेशापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जनतेने या काळात रस्त्यावर उतरू नये असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.