#Crime

महिलेवर धारदार शस्त्राने वार करून लुटले…..!

10 / 100

केज दि.30 – आठवडी बाजार करून एक महिला गावाकडे जात असताना पाठीमागून मोटार सायकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने सदरील महिलेवर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तसेच गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम ही पळवली.

                 तालुक्यातील विडा येथे शनिवारी आठवडी बाजार भरतो. परिसरातील शेकडो वाड्या वस्ती वरील लोक बाजाराला येतात.आणि आंधळेवाडी येथील कुशाबाई विश्वनाथ आंधळे ही महिलाही बाजार करण्यासाठी आली होती. परंतु सायंकाळी पाच ते सहा च्या दरम्यान जेव्हा सदरील महिला आंधळेवाडी या आपल्या गावाकडे निघाली तेव्हा पाठीमागून मोटरसायकलवर एक अज्ञात चोरटा आला आणि त्याने सदरील महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि बेदम मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याचे दागिने व महिलेजवळ असलेली रोख रक्कम ही पळवली. सदरील घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी सदर महिलेला विडा येथील आरोग्य केंद्रात उपचारार्थ केले आणि प्राथमिक उपचार झाल्यानंतर सदरील घटनेची तक्रार देण्यासाठी महिलेला केज पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले आहे.
                             दरम्यान, अशा प्रकारे घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीती पसरली असून अचानक जर असे हल्ले होऊ लागले तर सर्वसामान्य गावकऱ्यांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close