#Social
ओबीसी एल्गार सभेसाठी केज तालुक्यातून विक्रमी उपस्थिती – सचिन राऊत…!
केज दि.१२ – ओबीसी आरक्षण बचाव मेळावा बीड येथे संपन्न होत आहे.मागच्या कांही दिवसांपासून सदरील मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून केज तालुक्यातून सुमारे सहाशे चारचाकी आणि एक हजार दुचाकी गाड्यांचे नियोजन झाले असल्याची माहिती समता परिषदेचे केज तालुकाध्यक्ष सचिन राऊत यांनी दिली आहे.
अखिल भारतीय समता परिषदेचे संस्थापक तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी आरक्षण बचाव मेळावा बीड येथे 13 जानेवारी रोजी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदरील मेळावाऐतिहासिक करण्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगाने केज तालुक्यातील सकल ओबीसी समाज एकवटला असून गावागावांत जनजागृती करण्यात आलेली आहे.त्यानुसार केज तालुक्यातुन हजारो ओबीसी बांधव मेळाव्यासाठी सज्ज झाले असून तालुक्यातील गावागावातून आणि घराघरातील नागरिक सुमारे सहाशे चारचाकी आणि एक हजार दुचाकी गाड्या घेऊन बीडला पोहोचणार आहे.
दरम्यान, मेळाव्याला जाण्यापूर्वी केज शहरात रॅली काढण्यात येणार आहे. ओबीसींच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याचा प्रतिकार करण्यासाठी ओबीसी समाज बांधवांनी मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने सचिन राऊत यांनी केले आहे.