क्राइम
बारावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला…..!
केज दि.२ – येथे विद्यार्थ्यांच्या गॅदरिंगच्या कार्यक्रमात एका युवकावर चाकूने हल्ला करून त्याला मारहाण करण्यात आली. त्यावरून पाच विरुद्ध ॲट्रॉसिटी आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दि. २८ जानेवारी रोजी केज येथील पंचायत
समितीच्या मैदानावर शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तो कार्यक्रम पाहण्यासाठी सुदेश सिरसट यांचा इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत असलेला मुलगा सोनू सिरसट (अंश) व त्याचा मित्र आदित्य हजारे हे तेथे
गेले. ते दोघे स्टेज जवळ उभे राहून
कार्यक्रम पहात असताना सोनू सिरसट
याला पाठी मागून कोणी तरी दगड मारला म्हणून त्याने मागे वळून पाहिले असता त्याला ज्ञानेश्वर कोरडे हा दिसला. त्यावरून दोघात बाचाबाची झाली. त्या नंतर त्यांचे भांडण सोडविल्या नंतर तो दुसऱ्या ठिकाणी जाऊज कार्यक्रम पहात असताना सोनू सिरसट याला कोणतरी धारदार शस्त्राने पाठीच्या डाव्या बाजुला वार केला. त्याने पाठीमागे पाहिले असता ज्ञानेश्वर कोरडे यांचे हातात चाकु सारखे धारदार शस्त्र होते. त्या नंतर ज्ञानेश्वर कोरडे व त्याच्या साथीदारांनी सोनू सिरसट याला शस्त्राने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली.
दरम्यान, जखमी सोनू सिरसट याच्यावर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामिण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे उपचारा नंतर दि. २ फेब्रुवारी रोजी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून ज्ञानेश्वर कोरडे, संकेत चौरे, अमर धपाटे, गणेश गिरी आणि गजानन कोल्हे या पाच जणांच्या विरुद्ध नुसार अॅट्रॉसिटी
आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे पुढील तपास करत आहेत.