#Social
ज्ञानप्रबोधिनी शाळेत माता पालक मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न…..!
केज दि. ६ – शहरातील फुलेनगर भागात असलेल्या ज्ञान प्रबोधनी प्राथमिक शाळेमध्ये माता पालक मेळाव्याचे तसेच हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शेकडो महिलांची उपस्थिती होती.
फुले नगर भागातील ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक शाळेत दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मंगळवारी (दि.६) रोजी माता पालक मेळावा तसेच हळदी कुंकू वाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष सीता बनसोड तर प्रमुख अतिथी म्हणून अनिता पाटील, प्रियांका पाटील, शितल लांडगे, पत्रकार धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष सीता बनसोड यांनी उपस्थित माता पालकांना आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे तसेच संस्कारित बालके घडवण्याचे आवाहन केले. तर अन्य मान्यवर महिलांनीही आपले मनोगत व्यक्त केले.तर शाळेचे मुख्याध्यापक दयानंद देशमुख यांनीही शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जात असून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक दयानंद देशमुख यांच्यासह सहशिक्षिका श्रीमती बडे, साळवे, समुद्रे, श्री.चाळक यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.थोरात, सूत्रसंचलन श्री.जाधव तर आभार श्रीमती कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
