#Resarvation
शिक्षण आणि नौकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण…..!
मुंबई दि.२० – गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठा लढा देणाऱ्या मराठा बांधवांसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. मराठा समाजासाठीच्या आरक्षण विधेयकाला विधानसभेत एकमताने मंजुरी मिळाली आहे. मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १०-१० आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकारनं राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावलं होतं. विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत हे विधेयक मांडले आणि आवाजी मतदानाने या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने आज, मंगळवारी बोलावलेल्या राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची तरतूद असणारे विधेयक मंजूर झाले.
दरम्यान, आता हे विधेयक नुकतेच विधानपरिषदेतही एकमताने मंजूर झाल्याचे वृत्त आले असून राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.