#Accident
केज – बीड रोडवर पुन्हा एक अपघात…..!
केज दि.२४ – बीड – केज रोडवर पुन्हा एक दुर्दैवी अपघात झाला असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
शुक्रवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुक्यातील उमरी येथील राजाभाऊ श्रीपती भैरट आणि नरसिंग भैरट हे दोघे दुचाकी वर जात असताना त्यांच्या दुचाकीला एका टँकरची धडक लागली. आणि यामध्ये राजाभाऊ श्रीपती भैरट यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर नरसिंग भैरट हे गंभीर जखमी झाले आहेत.
केज बीड रोडवरील शिक्षक कॉलनीच्या जवळ सदरील अपघात झाला असून अपघाताची माहिती मिळतात केज पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि अपघातातील टँकर पोलीस स्टेशनला आणून लावण्यात आला आहे.
दरम्यान, मागच्या आठ दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका टिप्परने दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघात ग्रस्त इसमाचे दोन्हीही पाय निकामी झाली आहेत.सदरील रोडवर अपघात वारंवार अपघात घडू लागल्याने चिंता वाढली आहे. सदरील अपघात नेमका कसा घडला हे अद्याप स्पष्ट जरी झाले नसले तरी यामध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.