आरोग्य व शिक्षण
केजचे गटशिक्षणाधिकारी श्री.बेडसकर यांच्या उत्कृष्ट नियोजनात बोर्डाच्या परीक्षा सुरळीत…..!
केज दि.६ – सन 2023 -24 वर्षातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळांतर्गत विभागीय परीक्षा मंडळ छत्रपती संभाजी नगर यांचे कडून दिनांक 21 फेब्रुवारी 2024 पासून इयत्ता बारावी व दिनांक 1 मार्च 2024 पासून नियमितपणे केज तालुक्यात सुरू आहेत.
परीक्षेचे परिरक्षक कार्यालयाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी एल. बी. बेडस्कर असून सदर कार्यालय गट साधन केंद्र केज येथे आहे. परीक्षेचे नियोजन भयमुक्त, कॉपीमुक्त, पारदर्शक पणे व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कस्टडीत नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, विस्तार अधिकारी पंचायत समिती, शिक्षण, आरोग्य, कृषी पर्यवेक्षिका एकात्मिक बालविकास प्रकल्प, केंद्रप्रमुख, सर्व केंद्राचे केंद्र संचालक, सहसंचालक यांची बैठक घेऊन परीक्षेची गोपनीयता, भौतिक सुविधा, निर्भयपणे देता यावी. कॉपीमुक्त जिल्हा दक्षता समितीने बोर्डाने व तालुका दक्षता समितीने दिलेल्या सूचनेप्रमाणे परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
केज तालुक्यात एकूण बारावीचे 10 परीक्षा केंद्रातून 3878 परीक्षार्थी परीक्षा देत आहेत तर इयत्ता दहावी परीक्षेचे एकूण 14 केंद्र असून 3683 परीक्षांची परीक्षा देत आहे. नियंत्रणासाठी इयत्ता बारावी साठी दहा बैठे पथके, इयत्ता दहावी साठी 17 बैठे पथके तयार करण्यात आले असून प्रत्येक पथकात तीन तीन सदस्य आहेत. सदर पथकांना रोज आलटून पाठवून नवीन केंद्रे दिले आहेत कॉपीमुक्तीसाठी तालुका दक्षता समिती यांनी तहसील कार्यालय केस तहसीलदार यांचे एक भरारी पथक गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे एक पथक तर गटशिक्षणाधिरी कार्यालयाचे तीन भरारी पथके तयार करण्यात आले आहेत. नियमितपणे सकाळ दुपार परीक्षा केंद्रास भेटी दिल्या जातात. परिरक्षक कार्यालयाने प्रत्येक केंद्रावर एक सहाय्यक परिरक्षकाची नेमणूक केली असून ते केंद्रावर परीक्षा पूर्ण होईपर्यंत बसून असतात. तसेच वेळेत पेपर सुरू करणे व वेळेत बंद करणे याची दक्षता घेतात.
बोर्डाच्या नियोजनाप्रमाणे केज तालुक्यात सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरू आहेत. या कामी पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य आहे. तसेच पोलीस अधिकारी यांचे भरारी पथके आहेत. कॉपी मुक्तीसाठी तालुक्यातील सर्व झेरॉक्स सेंटर यांना परीक्षा कालावधीमध्ये झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.तर परीक्षा केंद्रावर आरोग्य कर्मचारी नेमले असून प्रथमोपचार केंद्र सुरू केले आहे.
दरम्यान, बोर्डाच्या नियमाप्रमाणे परीक्षा केज तालुक्यात सुरळीत सुरू आहेत. परीक्षा दालनात परीक्षार्थी सोडण्यापूर्वी सर्व परीक्षार्थींची तपासणी करूनच परीक्षा दालनात प्रवेश दिला जात आहे.त्यामुळे गटशिक्षणाधिकारी बेडसकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्हीही परीक्षा सुरळीत सुरू असल्याचे दिसत आहे.