क्राइम

स्टेटस ठेवल्याचे कारणावरून दोघांनी केली तरुणास मारहाण…..!

6 / 100
केज दि.८ –  सोशल मिडियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्टेट्स ठेवल्याचे भांडणातून दोघांनी एका तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील लव्हुरी या गावी गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
               अधिक माहिती अशी की, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लव्हुरी येथील एका हॉटेल समोर  गणेश नागनाथ चाळक बसलेला असता याच्याकडे गावातीलच राहुल सर्जेराव चाळक आणि कैलास सुरेश चाळक हे दोघे तिथे आले व सोशल मीडीयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे स्टेटस ठेवल्यावरून  त्यांच्यात वाद झाला. यातूनच कैलासने लोखंडी रॉडने गणेशच्या हातापायावर मारहाण केली. तर राहुलने गणेशला जिवे मारण्याची धमकी देत लाथाबुक्याने मारहाण केली.  यावेळा अमोल इंदरराव चाळक, नागनाथ हरिभाऊ चाळक यांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
                दरम्यान, गुरुवारी (दि.7) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व त्यांच्या सहका-यांनी गणेश चाळक याचा स्वाराति रुग्णालयात जवाब घेतला. शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान राहुल सर्जेराव चाळक व कैलास सुरेश चाळक (दोघेही रा. लव्हुरी ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास जमादार राजू वाघमारे हे करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close