#Accident
ट्रक आणि कारचा भीषण अपघात….!
केज दि.९ – पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरेगाव फाट्यावरील पुलाच्या अलीकडे ट्रक व कारचा पहाटेच्या वेळी भीषण अपघात झाला. यामध्ये चालक जागीच ठार झाला असल्याची माहिती मिळत असून अन्य एक जण जखमी झाला आहे.
केज मांजरसुंबा रोडवरील कोरेगाव पाटीजवळ असलेल्या पुलाच्या अलीकडे वळणावर पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कारचा अपघात झाला. सदरील अपघातात कार ट्रकच्या पूर्णपणे खाली अडकून पडलेली आहे. आणि त्यामध्येच चालकही दबलेला आहे. तर अन्य एक जण उपचारासाठी तिथून हलवण्यात आला आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच 108 चे डॉ. शाखेर शेख व पायलट अर्जुन बारगजे हे घटनास्थळी पोहोचले परंतु चालक हा पूर्णपणे कार मध्ये अडकला असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. तर सदरील मृतदेह क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्यात आल्याची माहिती केज पोलीस ठाण्याचे जमादार श्री.बिक्कड यांनी दिली.
दरम्यान सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी अपघातातील मृत हे गणेश गावंडे आणि जखमी सुखदेव ढोकरे हे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.