अखेर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला निर्णय…..!
मुंबई दि.१९ – राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात संपन्न होत आहे. मात्र राज्यातील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. कोणती जागा कुणाला द्यायची याबाबत संद्घीगतता निर्माण झालेली आहे. त्यामुळे विलंब होत असल्याने काही उमेदवारांना प्रचाराला अगदी कमी दिवस मिळणार आहेत. त्यापैकीच नाशिकची जागा आणि त्या जागेचाही तिढा अद्याप कायम आहे. नाशिक साठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे उमेदवार असतील की विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे असतील याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मागच्या काही दिवसांमध्ये नाशिकची जागा जाहीर करावी असं वारंवार बोलल्या जात होतं. मात्र तो तिढा अद्याप कायम आहे आणि याच संदर्भात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी मोठा विलंब झाला असल्याने नाशिक मध्ये आज पत्रकार परिषद घेतली आणि लोकसभेच्या निवडणुकीतून मी माघार घेत आहे असे जाहीर केले.