पोलिंग बूथ फॅसिलिटेशन सेंटर मतदान प्रशिक्षणाच्या दिवशी प्रशिक्षणाच्या स्थळी विठाई मंगल कार्यालय, धारूर रोड , केज येथे दिनांक 4 मे रोजी तसेच दिनांक 10 मे आणि 12 मे या दिवशी तहसील कार्यालय केज येथे उभारण्यात येणार आहे. पोस्टल बॅलेट द्वारे नोंदवले जाणारे मतदान हे फॅसिलिटेशन सेंटर येथे घेतले जाईल. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी माननीय निवडणूक आयोगाकडून 85 पेक्षा जास्त वय असणारे नागरिक आणि दिव्यांग नागरिक यांना होम वोटिंग ची सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार होम वोटिंग साठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांची बीएलओ यांच्यामार्फत यादी प्राप्त करुन घेऊन अंतिम करण्यात आली. अशा 23 सीनियर सिटीजन आणि 10 दिव्यांग नागरिकांचे होम वोटिंग दिनांक 6 मे व 7 मे 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्याकरिता केज मतदारसंघात एकूण 6 पोलिंग पथकाची स्थापना करण्यात आली असून पोलीस बंदोबस्तात प्रत्येक व्यक्तीच्या घरी जाऊन मतदान करुन घेतले जाईल.