केज दि.११ – आदर्श आचारसंहिता लागू असताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सत्कार समारंभास उपस्थित राहणे एका सरकारी कर्मचाऱ्यास भोवले असून आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक. 09/04/2024 रोजी सायंकाळी अंदाजे 19.30 ते 20.30 वाचे सुमारास नेकनुर येथिल ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दगडू शिंदे यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपर्क कार्यालय, नेकनुर- मांजरसुंबा रोड, नेकनूर, ता. जि. बीड येथे होता. त्यामुळे पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात नेकनूर येथिल ग्रमविकास अधिकारी दत्तात्रय शंकर नागरे हे हजर होते. असे दिनांक 15/04/2024 रोजी दोन वर्तमानपत्रात ग्रामविकास अधिकारी नेकनुर डी.एस. नागरे यांनी आचारसंहिता कालावधीत धनंजय मुंडे पालक मंत्री यांच्या स्वागत कार्यक्रमास उपस्थिती लावली व त्यांचा सत्कार केला अशी बातमी आलेली होती. त्यानुसार आचार संहिता कक्ष प्रमुख तथा गटविकास अधिकारी वर्ग-1 पंचायत समिती केज श्रीमती समृद्धी लालाजी दिवाणे-काळे यांनी आलेल्या वर्तमान पत्रातील बातमीच्या अनुषंगाने दिनांक 26/04/2024 रोजी चौकशी करुन सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी 39 बीड लोकसभा मतदारसंघ 232 (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ केज यांचे कडे अहवाल सादर केलेला आहे. तरी सदर चौकशी दरम्यान दत्तात्रय शंकर नागरे ग्रामविकास अधिकारी नेकनुर यांना अधिकचा खुलासा सादर करणे करीता संधी देवूनही आदर्श आचारसंहितेचा भंग केला नसले बाबत ते कोणताही पुरावा सादर करु शकले नाहीत. त्यामुळे निवडणुक आचारसंहिते बाबत दत्तात्रय शंकर नागरे ग्रमविकास अधिकारी नेकनुर यांनी निवडणुकीच्या कर्तव्याचे पालन करण्यात कसूर करुन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याने आज रोजी मला माझे वरीष्ट अधीकारी यांनी प्राधीकृत केल्याने आज रोजी पोलीस स्टेशन नेकनुर येथे येवुन फिर्याद देत आहे.
दरम्यान, दत्तात्रय शंकर नागरे ग्रामविकास अधिकारी नेकनुर यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लागु केलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने आचारसंहिता सहाय्यक पथक प्रमुख अभिमान सोमा राठोड यांच्या फिर्यादीवरून भारताचा लोकप्रतिनिधत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.