#Accident

मासेमारी करताना तरुणाचा बुडून मृत्यू…..!

1 / 100
केज दि.२४ – तालुक्यातील जिवाचीवाडी येथे तलावात मासे पकडायला गेलेल्या एका (३४) वर्षीय तरुणाचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. पोलिसांनी मृतदेहाचा शोध घेतला असता मृतदेह सापडलेला नव्हता. मात्र दुसऱ्या दिवशी परळी येथील रेस्क्यू टीमला मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे.
               केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील नितीन मच्छिंद्र काळे (वय ३४ वर्षे) हा तरुण मुंबई येथे राहत असून काही दिवसांपूर्वी तो धार्मिक कार्यासाठी गावात आला होता. गुरुवार दि. २३ मे रोजी दुपारी २:०० वाजण्याच्या सुमारास तो जिवाचीवाडी येथील गावालगतच्या तलावात मासे धरण्यासाठी गेला होता, मात्र त्याला पाण्याचा आणि मासेमारीसाठी तळ्यात टाकलेल्या जाळ्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
           दरम्यान, घटनेची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या आदेशाने पोलीस नाईक राजवीर वंजारे आणि पोलीस नाईक शमीम पाशा हे घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी स्थानिक गावकरी व मच्छीमारांच्या साह्याने मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी अंधार असल्यामुळे मृतदेहाचा शोध लागला नाही. नंतर परळी येथून रेस्क्यू टीमला पाचारीत करण्यात आले आणि त्या टीमला आज (दि.२४) दुपारी मृतदेह शोधण्यात यश आले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवण्यात आला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close