#Accident

धारूर घाटात दोन अपघात….!

6 / 100
किल्लेधारुर दि.31 – Accident आयशर टेम्पो व रिक्षाची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातामध्ये रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धारूर घाटामध्ये शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. माऊली भास्कर घुले वय ३० वर्षे रा. गावंदरा असे मयत झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.
                धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे. शुक्रवारी दुपारी धारूर कडून आयशर टेम्पो तेलगावकडे जात होता. यावेळी तेलगाव कडून येणाऱ्या रिक्षास घाटातील धोकादायक वळणाच्या ठिकाणी समोरा -समोर धडक झाली. त्या अपघातात रिक्षाचालक माऊली भास्कर घुले गंभीर जखमी झाला. त्यास स्वाराती  रुग्णालय अंबाजोगाई येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातामध्ये आयशर टेम्पो व रिक्षाचा समोरील भाग चकाचूर झाला आहे. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर दोन्ही वाहने बराशीमध्ये गेले.
              दरम्यान, धारूर घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून गुरुवारी रात्रीही एका दुचाकी स्वारास टिप्परची धडक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अवघ्या २४ तासात घाटामध्ये अपघातामुळे दोघांचा बळी गेला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close