राजकीय

चूरशीच्या लढतीत बजरंग सोनवणे विजयी…..!

6 / 100
बीड दि.4 – आठराव्या लोकसभेसाठी बीड लोकसभा मतदारसंघात झालेल्या अत्यंत अतितटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा 6553 मतांनी पराभव केला.
              2009 पासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ भाजप कडून घेण्यात  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला यश आले आहे. बजरंग
सोनवणे यांना 6 लाख 83 हजार 950 मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी पंकजा मुंडे यांना 6 लाख 77 हजार 397 इतकी मते मिळाली. बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्यापासूनच चुरसीची होती. भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा  मुंडे यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरचंद्र
पवार) पक्षाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. सोनवणे यांनी मागची निवडणुक प्रितम मुंडे यांच्या विरोधात लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र यावेळी बजरंग सोनवणे विजयी झाले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close