भास्कर मस्के यांना मागच्या कांही दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाला होता.त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू होते.मात्र उपचारा दरम्यान त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला.भास्कर मस्के, हे केज शहरातील अत्यंत सामान्य, गरीब परिवारातील श्रीमंत आंबेडकरी विचारांचा कडवट कार्यकर्ता होता. शिक्षण कमी असले तरी चळवळीशी जोडलेला सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होतु. प्रत्येक सामाजिक प्रश्नावरील मोर्चे व केजच्या इतर आंदोलनात ते दिसायचे. गरज पडेल तेंव्हा स्वतःच्या उदर निर्वाहासाठी मजुरी करून आपला स्वाभिमान कायम ठेवणारा हा कार्यकर्ता होता.
त्यांच्यावर शनिवारी दुपारी बारा वाजता भिमनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.