#Social
जलजीवन च्या कामाची सखोल चौकशी करा…!
किल्ले धारूर दि.१९ – तालुक्यातील मोजे गोपाळपूर ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित इंजिनीयर व गुत्तेदारावर कठोर कारवाई करून संबंधीत कामाचे देयके अदा न करणे बाबत दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विशाल सराफ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बीड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर तालुक्यातील मोने गोपाळपूर धामपंचायत मार्फत जलनीवन मिशन योजने अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनचे काम गेल्या एक वर्षापासून सुरू असून सदर काम अद्याप पर्यंत पूर्णत्वाकडे गेलेले नाही. जल जीवन मिशन अंतर्गत मोजे गोपाळपूर, संभानीनगर, शिक्षक कॉलनी, गोपाळपूर, भायजळी, या ठिकाणच्या नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने हर घर जल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाच्या वतीने चार कोटी रुपये खर्च केल्या जात आहेत.
दरम्यान, पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार होत असून सदरील प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी इंजिनिअर अधिकारी व गुतेदारावर योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्ते विशाल सराफ यांनी केली आहे.