ब्रेकिंग
पंकजा मुंडे विधानपरिषद निवडणुकीत विजयी….!
मुंबई दि.१२ – आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेत पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी विजयासाठी आवश्यक 23 मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष करण्यात येत आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत काय होणार? अशी चर्चा होती. खासकरून सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे
यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू होती. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत पंकजा मुंडे या 23 मते घेऊन निवडून आल्या आहेत. त्यामुळे अखेर पंकजा मुंडे यांचा संसदीय राजकारणात प्रवेश झाला आहे.
दरम्यान, पंकजा मुंडे यांना पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत आधी एक, नंतर 6, नंतर 7 आणि 10 मते मिळाली. संथगतीने पंकजा मुंडे यांची मते वाढत असल्याने धाकधूक वाढली होती. त्यामुळे पंकजा मुंडे समर्थकांचे चेहरे खिन्न झाले होते. पण पंकजा मुंडे यांनी मतांचा आवश्यक कोटा पूर्ण करून विजय मिळवताच सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर पंकजा मुंडे समर्थक त्यांच्याकडे मंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.