#Social
डॉ. अंजली घाडगे यांचा संवाद दौरा सुरू…..!

केज दि.१४ – सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ.अंजली घाडगे यांनी केज विधानसभा मतदारसंघात संवाद दौरा सुरू केला आहे.मागच्या आठ दिवसांपासून नेकनूर आणि केज परिसरात विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या असून ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात येत आहे.
या संवाद दौऱ्या दरम्यान, शहरापासून जवळच असलेल्या स्वामी समर्थ वृद्धाश्रमास केज विधानसभा मतदार संघाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अंजली घाडगे यांनी भेट देत जेष्ठ नागरिक, वृद्ध महिलांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या व्यथा जाणून घेत वृद्धाश्रमास वेळोवेळी मदत करण्याचा शब्द दिला.
केज शहरातील स्वामी समर्थ वृद्धाश्रमास मदतीची गरज असताना मागील काही दिवसांपूर्वी केज विधानसभा मतदार संघाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अंजली घाडगे यांनी किराणा व जीवनावश्यक वस्तू पाठवून दिल्या होत्या. त्यांना उपस्थित राहता न आल्याने गुरुवारी त्यांनी या वृद्धाश्रमास भेट दिली. वृद्धाश्रमात असलेल्या जेष्ठ नागरिक व महिलांशी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण ही व्यतीत केले. ज्या आजी-आजोबांना जीवन जगण्यासाठी कुठलाही आधार नाही. अशा आजी-आजोबांना स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचा आधार मिळाल्याने त्यांचे जीवन आनंदाने जगण्याची संधी वृद्धाश्रमाचे संचालक बापू कराड यांच्यामुळे मिळाली आहे. त्यामुळे वृद्धाश्रमास लागेल ती आवश्यक मदत देण्यासाठी तत्पर राहू व सुख दुःखात सोबत असल्याची ग्वाही डॉ. अंजली घाडगे यांनी दिली.
