#Judgement
लाच मागितल्या प्रकरणी गुन्ह्यातून दोघांची निर्दोष मुक्तता….!
केज दि.२० – फेरफार मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या खटल्यात तलाठी व सहाय्यक या दोघांचीही साक्षी पुरावे तपासांती केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
प्रकरणातील तक्रारदार यांनी सन 2016 साली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांच्याकडे त्याचा वारसाचा फेरफार मंजूर करण्याकरिता आरोपी यांनी लाचेची रक्कम 2200/- मागितली, म्हणून तक्रार केली होती. मात्र तक्रारदाराची पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांनी सापळा रचून आरोपी विरुद्ध गुन्हा क्रमांक 73/2016 पोलीस स्टेशन केज येथे नोंदवण्यात आला होता.
त्यानंतर दोषारोपपत्र मा.अति.सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण दि.18 जुलै 2024 रोजी मा. न्यायालयाने अभियोगपक्ष दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करू न शकल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता केली. विशेष बाब म्हणजे अभियोग पक्षाचा एकही साक्षीदार प्रकरणात फितूर झाला नव्हता.
सदरील प्रकरणात आरोपींची बाजू प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. अशोक ससाणे यांनी मांडली.