महाराष्ट्र
राष्ट्रीय सचिवपदी मा. आ. संगीता ठोंबरे यांची नियुक्ती…..!
केज दि.२० – “ऐसा चाहूं राज में, उचित सबन को अन्ना – छोटा बड़ा सब साथ बसाई, रविदास सुखी रहे” तसेच सध्याच्या काळात ‘सबका साथ’ ‘सबका विकास आणि सबका विश्वास’ या विचारधारेवर चालणाऱ्या श्री.गुरू रविदास विश्व महापीठ सामाजिक संस्थेच्या राष्ट्रीय सचिवपदी माजी आमदार संगीता ठोंबरे यांची वर्णी लागली आहे.
श्री गुरु रविदास विश्व महापीठ संस्था ही देशातील आणि जगातील लाखो रविदास समाजाच्या समूहाची एक सामाजिक संस्था आहे. ज्यामध्ये रविदास समाजातील सर्व प्रमुख सदस्य, अनेक देशांचे केंद्रीय आणि राज्य स्तरावरील मंत्री, सदस्य यांचा समावेश आहे. लोकसभा-राज्यसभा, विधानसभा सदस्य, केंद्रीय आणि राज्य पातळीवर काम करणारे अधिकारी आणि विचारवंत, पत्रकार, अधिवक्ता, निवृत्त अधिकारी-कर्मचारी, शिक्षणतज्ज्ञ, तरुण विद्यार्थी इत्यादींचा समावेश आहे.
दरम्यान, श्री गुरू रविदास विश्व महापीठ संस्थेची कार्यकारिणी दि.18 जुलै 2024 रोजी औपचारिकपणे जाहीर करण्यात आली. यामध्ये केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता विजयाप्रकाश ठोंबरे यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.