राजकीय
केजमध्ये जनसंवाद मेळावा…. !
केज दि.२६ – ऑक्टोंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून सर्वच उमेदवार तयारीला लागलेले आहेत.रमेश गालफाडे यांनी केज विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.त्यांनी मतदारसंघामध्ये संपर्क वाढविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू करून गावभेटीवर भर देण्याचे काम सुरू केले आहे. त्या अनुषंगाने जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकळे जाणार असून त्या पार्श्वभूमीवर गालफाडे यांनी जनसंपर्क वाढवला आहे.गालफाडे यांनी मतदार संघात गावभेटीवर जोर दिला आहे.केज विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी रमेश गालफाडे यांनी पूर्ण ताकद लावली असल्याचे समजले जाते. मुबई, पुणे येथे काही बड्या राजकीय नेत्यांची भेट घेऊन केज विधानसभा संदर्भात चर्चा केल्याची देखील मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे. रमेश गालफाडे गेल्या अनेक दिवसापासून केज-अंबाजोगाई मतदार संघात मतदार बांधवाच्या भेटी गाठी घेताना दिसत आहेत.निवढणूक लढवण्यासाठी गालफाडे सज्ज आहेत, त्यांना मतदार संघात ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, रमेश गालफाडे यांनी मतदारसंघातील जनतेसाठी “जनसंवाद मेळावा’ दि.३० जुलै २०२४ रोजी मुक्ताई फंक्शन हॉल भवानी चौक केज येथे ठेवण्यात आहे. या जनसंवाद मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. तरी मेळाव्यासाठी मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रमेश गालफाडे मित्र परिवाराकडून करण्यात आले आहे.