आपला जिल्हा
चिंचोली माळी येथे हरिनाम सप्ताहाचे आयोजन….!
केज दि.३१ – तालुक्यातील चिंचोली (माळी) येथे श्री. संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री संत सावता महाराज यांच्या 729 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री. संत सावता महाराज चरित्र कथा सोहळ्याचे भव्य आयोजन केले आहे.
सप्ताहातील चौथ्या दिवसाचे किर्तन पुष्प किर्तन केसरी ह.भ.प. अकूरजी महाराज साखरे यांनी “आयोलिया हिता। जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ।। कुळीकन्या पुत्र होति जे सात्विक । तयाचा हारीक वारे देवा ।।” या अंभगावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. पुढे बोलताना महाराज म्हणाले की, मनुष्यजीवाने आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहयला पाहिजे. माता जिजाऊ, मदर तेरेसा, आहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राम-भरत यांचे बंधूप्रेम अशी उत्कृष्ट उदाहरणे देऊन मोलाचे प्रबोधन केले.
हा भव्य कार्यक्रम मृदंग विशारद विलास महाराज कोरडे, गायनाचार्य संगीत अलंकार सुमंत म. डाके, भजनगंधर्व, वैभव म. फुलझळके आणि संगीत विषारद बालू म. कोरडे, यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. तरी अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तानी घ्यावा असे आवाहन सप्ताह कमटीच्या वतीने राम राऊत, अरुण काळे, महादेव शिंदे, अभिजीत राऊत यानी केले आहे.