#Social
स्वातंत्र्यदिनी होणार हनुमान ज्वेलर्स च्या ड्रॉ ची सोडत…..!
केज दि.13 – शहरातील हनुमान ज्वेलर्स च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या लकी ड्रॉ स्कीम ची सोडत दि.15 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यामध्ये मोटारसायकल जिंकणारे भाग्यवंत ग्राहक कोण ठरतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
सदरील सोडत बीड येथील इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष विठ्ठलानंद दास यांच्या हस्ते होणार आहे. तर सोडत होण्याच्या अगोदर हनुमान ज्वेलर्स सराफा लाईन केज येथे 10.45 ते 11 वाजेपर्यंत सुश्राव्य भजनाचेही आयोजन करण्यात आले आहे.त्यानंतर सोडत होईल आणि यामध्ये एक भाग्यवान ग्राहक एचएफ डीलक्स मोटर सायकल जिंकणार आहे.
तरी ज्या ग्राहकांना कुपण मिळालेल्या सर्व ग्राहकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हनुमान ज्वेलर्स च्या वतीने श्रीराम हेमंत रुद्रावार यांनी केले आहे.