#Social
वृक्ष वितरणासह वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड….!
केज दि.१५ – विधानसभा मतदारसंघाच्या माजी मंत्री स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने बनसारोळा येथेही राजपाल काकडे मित्र मंडळाच्या वतीने वृक्ष वितरणासह मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली.
स्व. विमल ताई मुंदडा यांच्या जयंती निमित्त राजपाल काकडे मित्र परिवाराच्या वतीने वृक्षारोपण करून वृक्षा चे वाटप करण्यात आले. या वेळी बनसारोळा गावचे सरपंच अजित गोरे, उपसरपंच चंद्रकांत धायगुडे, मनोहर गोरे, शिवाजी लोखंडे, विकासराव पोळ, सुजित जोगदंड, शरीफ सय्यद, धनाजी धायगुडे, आदित्य काकडे, महादेव धायगुडे, वसंत वाघमारे, सोहेल तांबोळी, रमेश पुजारी तसेच कलीम सय्यद यांच्यासह गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
दरम्यान, दरवर्षी राजपाल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र मंडळाच्या वतीने समाजोपयोगी कार्यक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जाते.