#Social

आदर्श ग्रामपंचायत कोल्हेवाडी अंतर्गत विविध ठिकाणी ध्वजारोहण…!

9 / 100
केज दि.१५ – तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या कोल्हेवाडी येथे 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
                 यावेळी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिसाळ वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डांगे वस्ती जिल्हा परिषद शाळा तसेच शहीद जवान उमेश मिसाळ स्मारक येथे ही ध्वजारोहण करण्यात आले. तर ध्वजारोहण कार्यक्रम पार पडल्यानंतर ”हर घर तिरंगा घर घर तिरंगा’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील विद्यार्थी, नागरिक, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          दरम्यान, कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे सर यांनी केले तर समारोप डोईफोडे सर यांनी केला.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close