ब्रेकिंग
मतिमंद व मूकबधिर शाळेतील बालकांना शालेय साहित्य वाटप….!

केज दि.१८ – तालुक्यातील एक जाणते व्यक्तिमत्व स्वर्गीय रामराव घाडगे गुरुजी यांचे वर्षश्राद्धनांक 17 ऑगस्ट रोजी होते. या निमित्त घाडगे गुरुजींच्या कुटुंबीयांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली. शहरातील फुलेनगर भागात वास्तव्यास असणारे स्वर्गीय रामराव घाडगे गुरुजी हे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये एक अनुभवी आणि जाणते व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. मात्र मागच्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. काल दिनांक 17 ऑगस्ट रोजी त्यांचे वर्षश्राद्ध होते. त्यानिमित्त घाडगे कुटुंबीयांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले. यामध्ये उमरी येथील मूकबधिर व मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व खेळाचे साहित्य देऊन घाडगे गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, घाडगे गुरुजींचे नाव जसे सामाजिक क्षेत्रामध्ये होते त्याचा वारसा डॉ. अंजली घाडगे व त्यांच्या इतर मुली पुढे नेत आहेत.