आरोग्य व शिक्षण
पिडीएस शाळेत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी….!
केज दि.२२ – तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तालुका आरोग्य कार्यालयाचे वतीने विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विविध छोट्या-मोठ्या आजारांचा परिणाम सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा काही वायरल आजार दिसून येत आहेत. विशेषत: यामध्ये जे विद्यार्थी निवासी असतात त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी होणे गरजेचे असते. आणि त्याच अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कार्यालयाच्या वतीने सुमारे 100 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर श्रीकांत सूर्यवंशी यांच्यासह आरोग्य कर्मचारी आर. आर. थोरात, रुपाली मस्के यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केला. तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयीही मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पी.एच. लोमटे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.