ब्रेकिंग
मा. आ. संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला….!

केज दि.२८ – विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार प्राध्यापक संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
केज तालुक्यातील दहिफळ येथे संगीता ठोंबरे ह्या शाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. मात्र त्या परत येत असताना त्यांच्या गाडीच्या खिडकीवर दगड मारला. यामध्ये चालकाला दगड लागून संगीता ठोंबरे या ही जखमी झाल्या आहेत. घटना घडल्यानंतर ठोंबरे यांच्यावर केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांनी दिली आहे. सदरील प्रकार नेमका कोणत्या करणातून घडला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.