ब्रेकिंग
केजला मिळाले पदाचे तहसीलदार…!

केज दि.३० – मागच्या कित्येक दिवसांपासून केज तहसीलचा कारभार प्रभारी तहसीलदार मार्फत चालत होता. मात्र अखेर केज तहसीलला राकेश अण्णासाहेब गिड्डे यांची नेमणूक करण्यात आल्याचे आदेश निर्गमित झाले आहेत.त्यामुळे कामाला गती मिळण्याची अपेक्षा आहे.
केज शहरामध्ये प्रमुख कार्यालयाचे अधिकारी हे प्रभारी आहेत. त्यामुळे जनतेची कामे वेळेवर होताना दिसत नाहीत. यासंबंधी माध्यमांमधून मागच्या दोन दिवसांपूर्वीच आवाज उठवण्यात आला होता. केज शहरातील जे प्रमुख कार्यालय आहे त्या तहसीलला आता पदाचे अधिकारी आलेले असल्याने जनतेच्या कामाला विलंब होणार नाही अशी सर्वसामान्य लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत. तर या पूर्वीचे तहसीलदार अभिजित जगताप यांची धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, गिड्डे यांची नेमणूक झाल्याचे आदेश आजच निघाले असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये ते केज तहसीलला रुजू होण्याची शक्यता आहे.