मुझ्झफरपूर – पैश्यासाठी कोण कधी काय करेल याचा नेम राहिलेला नाही. नातेसंबंध, नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा पैश्यापुढे गौण झालेल्या आहेत. खून, दरोडे इत्यादी गोष्टी तर गुन्हेगारी जगतात नवीन राहिलेल्या नाहीत. आणि हे सर्व कश्यासाठी ते केवळ अन केवळ स्वार्थासाठी.
मात्र बिहार मध्ये सरकारी योजनेत एक नवीनच घोटाळा समोर आला आहे. निसर्ग नियमाला धाब्यावर बसवले आहे. एका 65 वर्षीय महिलेने गेल्या 14 महिन्यांत 8 मुलांना जन्म दिला आहे. वैद्यकीय शास्त्रात हे अशक्य आहे, परंतु राष्ट्रीय आरोग्य अभियानाने ते शक्य केले आहे. तेही कागदावर जेणेकरुन मुलींचा जन्म झाल्यावर मिळणारी प्रोत्साहन रक्कम हडप केली जाऊ शकेल. ही बाब बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मुशहरी परिसरातील आहे. या घोटाळ्यात मध्यस्थांनी कागदावर मुलींचा बनावट जन्म दाखवून प्रोत्साहनपर पैसे हडपले आहेत. अशा बर्याच स्त्रिया आहेत ज्या आई होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्याद्वारे मुलींचा जन्म दर्शवून पैसे हडपण्याचा डाव रचण्यात आला आहे.
65 वर्षीय महिलेने अवघ्या 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला आहे. मिशन अधिकारी आणि बँकेचे सीएसपी या आधारहीन दस्तऐवजावर एका वृद्ध महिलेला प्रोत्साहनपर पैसे पाठवत असत. या प्रकरणात मसुहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी उपेंद्र चौधरी यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. 65 वर्षाच्या लीला देवीने 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला. प्रत्येक जन्मासाठी लीला देवीचे 1400 रुपये तिच्या नमूद केलेल्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. इतकेच नाही तर खात्यातून पैसेही काढून घेण्यात आले आहेत.