शेती

आज पुन्हा पावसाची दमदार हजेरी….!

9 / 100

केज दि.६ – चार दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यामध्ये बहुतांश भागांमध्ये पावसाने चांगले हजेरी लावल्याने लहान मोठ्या तलाव आणि धरणांमध्ये पाण्याचा साठा वाढला आहे. मात्र चार दिवसांपासून थोडीशी पावसाने उसंत दिलेली होती. परंतु शुक्रवारी चारच्या दरम्यान पुन्हा पावसाने केस तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली आणि तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये बराच वेळ वरून राजा बरसला.

           सदरील पावसाने सखल भागामध्येही पाणी साचल्याने या पावसाचाही जे काही धरणं आणखीन भरायची राहिलेली आहेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. परंतु आता जे काढणीला पीकं आलेली आहेत त्याच्यामध्ये काही विघ्न येऊ नये अशी शेतकरी अपेक्षा व्यक्त करत आहे.
           दरम्यान, पाऊस गरजेचा आहे त्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटणार नाही. मोठे प्रकल्प आणि छोटे-मोठे तलाव हे आणखीही काही दमदार पाऊस झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे एकीकडे पाऊस तर पाहिजे परंतु पिकांचेही कांही नुकसान होऊ असा पेच निर्माण झाला आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close