केज दि.22 – मागच्या कांही दिवसांपूर्वी केज तालुक्यात रुग्ण संख्या वाढत चालली होती. त्यामुळे अँटीजन टेस्ट घेण्यात येऊन प्रसार थांबवण्याचे प्रयत्न झाले आहेत. तसेच प्रयोगशाळेत पाठवून तपासणी करण्यात येत असलेल्या स्वॅब मधूनही पॉजिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत आहे.
आज आलेल्या पॉजिटिव्ह रिपोर्ट्स मध्ये जिल्ह्यात अंबाजोगाई 17, बीड 29, केज (शिवाजीनगर) 1, माजलगाव 13, परळी 2, शिरूर 5, वडवणी 1, गेवराई 6, धारूर 5, आष्टी 3 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
ही दुकाने उघडणार……!
दरम्यान जिल्ह्यातील बीड,
माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहित्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. तसेच सर्वांनी कोवीड-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. तर कन्टेनमेंट झोन परिसरातील निर्बंध तसेच कायम राहतील.
Related